Homeक्राईमअपघात बनावाच कट; पाच लाखाची सुपारी घेणारे दोन आरोपी जेरबंद

अपघात बनावाच कट; पाच लाखाची सुपारी घेणारे दोन आरोपी जेरबंद

यवत : दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १०:४५ वाचे सुमारास मौजे पाटस ता. दौंड जि. पुणे गावचे हददीत पाटस-कानगाव रोड पळसे पुर्नवसन डी. पी. जवळील रोडवर फिर्यादी हे रोडने त्यांचे मोटार सायकल वरून घरी जात असताना पळसे पुर्नवसन डी.पी. जवळुन रोडने पाटस बाजुकडुन कानगाव बाजुकडे फिर्यादी त्यांचे ताब्यातील हिरो होंडा सी.डी. डिलक्स कंपनीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.४२ सी. ९८४३ या वरून जात असताना फिर्यादी यांचे पाठीमागुन आलेली ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची वेनू मॉडेलची नंबर नसलेली चार चाकी कार वरील अज्ञात चालकाने ती भरधाव वेगात कानगाव बाजुकडे चालवित घेवुन जात असताना तिची ठोस फिर्यादी यांचे मोटार सायकलला पाठीमागुन बसुन अपघात होवुन अपघातात फिर्यादी यांचे दोन्ही खांदयाला, डोकीस, कपाळास, उजव्या पायास मार लागला असुन दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत होवुन तेथुन गाडीचा चालक पळुन गेला आहे वरील मजकुरावरून सदर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
सदर अपघाताच्या अनुषंगाने घटनास्थळ तसेच अपघातग्रस्त वाहनांची परीस्थीती पाहता सदर अपघात हा घातपात असल्याची दाट शक्यता पाटस पोलीस ठाण्याचे सलिम शेख पोलीस उपनिरीक्षक यांना आल्याने सदरची माहीती वरीष्ठांना कळवुन वरीष्ठाचे मार्गदर्शनाखाली तात्रिंक विश्लेषन व सी.सी.टी.व्ही. तपासणी करून गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती घेवुन अपघाताची सखोल चौकशी केली असता सदरचा प्रकार हा अपघात नसुन अपघाताचा बनाव करून कट रचुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपास अंती निष्पन्न झाले.
यामध्ये संशयीत म्हणुन अक्षय गोपीनाथ चव्हाण वय-२७ वर्षे सध्या रा. पाटस ता. दौंड जि.पुणे मुळ रा. खेड ता. कर्जत जि. अहमदनगर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले कि जखमी नामे वैभव दिवेकर रा. पाटस ता. दौंड जि.पुणे यास चार चाकी गाडीने ठोस देवुन त्यास जिवे ठार मारण्यासाठी अक्षय बबन कोळेकर, रा. पाटस ता. दौंड जि. पुणे याने मला तसेच तुषार चोरमले, सुरज विजय पवार रा. पाटस ता. दौंड जि.पुणे, लाला पाटील रा. भिगवण ता. इंदापुर जि. पुणे असे आम्हाला ५ लाख रूपयाची सुपारी दिली असल्याचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो पुणे ग्रा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार साो बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस साो, दौंड विभाग, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सलीम शेख, पासेई वागज, पो. हवा. गुरूनाथ गायकवाड, सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार अनिल ओमासे, सहा. फौजदार भानुदास बंडगर, पो.हवा. हिरालाल खोमणे, पो. हवा. अक्षय यादव, पो.हवा. संदीप देवकर, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. विकास कापरे, पो.हवा. रामदास जगताप, पो.हवा. कानिफनाथ पानसरे, पो.कॉ. मारूती बाराते, पो. कॉ. गणेश मुटेकर यांनी केली असुन यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले असुन ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख हे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.B4E22517.1749765529.3AAEAEAEAE Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1749760222222.8b78ce Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c61002.17497577702.10 सीसीएफ 8 ईसी Source link

हबलला कॉस्मिक डस्ट कोटिंग युरेनसचे चंद्र सापडतात, रेडिएशन स्कार्स नव्हे

0
नवीनतम हबल स्पेस दुर्बिणीच्या निरीक्षणामध्ये युरेनसच्या चंद्राच्या कथेत एक पिळ दिसून येते. अपेक्षित रेडिएशन “सनबर्न” ऐवजी चंद्र एरियल, अंब्रिल, टायटानिया आणि ओबेरॉन अक्षरशः वैश्विक...

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1749753751.883A137 Source link

error: Content is protected !!