विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार पक्षाचे पुणे जिल्लाध्यक्ष मा. सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वखाली आज दि : 19 ऑक्टोबर 2024 रोजी दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्ते जानी बाबा शेख यांची दौंड तालुका अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष पदी जाहीर निवड करण्यात आली आहे. तसेच मयूर सुनील उदावंत यांची जनरल कामगार दौंड तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे, आणि उज्ज्वल पांडुरंग सुर्वे यांची दौंड तालुका संघटक म्हणून निवड झाली आहे, या पदाधिकारी यांची निवड जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र पुन्हा जिल्हा अध्यक्ष सचिन खरात यांनी दिले.
या कार्यक्रमात शशांक गायकवाड दौंड शहराध्यक्ष, संजय ऐरेल्लू वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष, अभय भोसले विध्यार्थ आघाडी दौंड शहराध्यक्ष, दिगंबर रिकीबे दौंड शहर कार्याध्यक्ष, सन्नी गायकवाड दौंड शहर कार्याधक्ष युवा, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.